Home  |  Contact Us |  Customer Care

ई- क्रॉप एस्टिमेशन

ई- क्रॉप एस्टिमेशन ही इंटरनेट आधारित संगणक प्रणाली असुन तिचा उपयोग मुख्य, दुय्यम व फळे भाजीपाला पीक कापणी प्रयोगांचे नियोजन करणे तसेच क्षेत्रीय स्तर ते विभाग व राज्य स्तरापर्यंत संकलन अहवाल तयार करण्यासाठी होतो.
राज्यस्तरावर हंगाम, पीक व अधिसूचित क्षेत्राप्रमाणे महसूल मंडळ निहाय पीक कापणी प्रयोगाचे नियोजनाचे वाटप केले जाते तसेच विविध स्तरावरील पीक कापणी प्रयोगाचे विविध अहवाल पाहता येतात. विभाग स्तरावर पीक कापणी प्रयोगाचे विभाग, जिल्हा व तालुका निहाय विविध अहवाल पाहता येतात.
जिल्हास्तरावर हंगाम, पीक, महसूल मंडळ, गांव व यंत्रणानिहाय (कृषि, जिल्हा परिषद, महसूल) नियोजनाचे वाटप केले जाते तसेच तालुका स्तरावरील पीक कापणी प्रयोगाचे विविध अहवाल पाहता येतात. तालुकास्तरावर यंत्रणा व पीक निहाय पीक कापणी प्रयोगांची माहिती भरली जाते. यामध्ये प्रयोगाची आवक भरणे, गाव बदल, मंडळ बदल, एन आर/एन सी/ एन सी आर व प्रयोगाचे संकलन भरले जाते.